चहा करणं ही देखील एक पाककला आहे असेच आम्ही मानतो. एखादी गृहिणी खास बेत करण्यासाठी जेवढी राबते, तेवढेच कष्ट चहा ‘अमृततुल्य’ होण्यासाठी आम्ही घेतो. येवल्यांच्या पुढच्या पिढीतल्या आम्हा भावंडांनी आणि कुटुंबातील महिलांसह प्रत्येक सदस्याने सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. स्वच्छ पाण्यापासून ते चहाच्या पावडरीपर्यंत आणि साखरेच्या प्रमाणापासून ते मसाल्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट इथे पारखली जाते. बाहेरच्या मसाल्यांपेक्षाही आपल्या हातांनी मसाला बनविण्यातलं समाधान काही औरच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व ‘येवले कुटुंबीय‘ आज एकजुटीने काम करत असल्यामुळेच ‘येवले चहा’ची चव आज सगळीकडे सारखीच आणि दर्जेदार ठरली आहे.

पण चहाचं हॉटेल म्हटल्यावर ते कळक्कटं-मळक्कटं हे चित्र बदलून एक अतिशय स्वच्छ ब्रँड, ज्याला आपण हायजनिक म्हणतो, अशा स्वरूपात आम्ही तुमच्यापुढे आलेलो आहोत. आमच्याकडचे सर्व कामगार प्रशिक्षित तर आहेच शिवाय त्यांना ग्राहकसेवेचे विशेष प्रशिक्षणही दिलेले आहे. अशा रीतीने ‘येवले चहा’ हा कॉर्पोरेट पध्दतीने पुढे जात आहे.