आपल्या खास चवीनं ‘येवले चहा’ने पुणेकरांची मनं अल्पावधीतच जिंकली आणि त्याचबरोबर माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी लेखण्यांनीही हा चहा टिपला. सोशल मीडियातही ‘येवले चहा’च्या जाहिराती लोकांची मने जिंकत आहेत. विशेषतः फेसबुकवरील चालू घडामोडीवरच्या जाहिराती प्रचंड लाईक्स मिळवत आहेत. या जाहिरातींमधील प्रभावी व्यंगचित्रे ही देखील ‘येवले चहा’ची नवी ओळख होऊ पाहात आहे. एकंदरितच सर्व सोशल माध्यमांवर ‘येवले चहा’ हा विशेष चर्चेचा विषय ठरलेला आहे. विशेषतः इतक्या कमी काळात येवले चहाने घेतलेली भरारी ही सर्व प्रसारमाध्यमांमधील ‘ब्रेकिंग टी न्यूज’ ठरलेली आहे.सुप्रसिध्द टीव्ही चॅनेल्सनी या चहाची दखल घेत येवलेंच्या मुलाखतीही घेतल्या. नावाजलेल्या वृत्तपत्रांनी ‘येवले चहा’वर विशेष लेखही छापले. या सर्व माध्यमांमधील या वाफाळत्या गोष्टी !