खास चवीचा ‘येवले चहा’ आज पुणेकरांना आवडतोय. पुणेकरांनाच का तर जगातल्या सगळया चहाप्रेमींना आवडणारी ही चव आहे. म्हणूनच ‘आमची कुठेही शाखा नाही’ ही पुणेरी वृत्ती सोडून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्याच्या वेगाने पोहचत आहोत. त्यानंतर देशाच्या इतर राज्यात अगदी दार्जिलिंगमध्येही ‘येवले चहा’ मिळावा असं आमचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. इतकंच नव्हे तर जगात जिथे जिथे चहा आवडीने प्यायला जातो अशा प्रत्येक देशात ‘येवले चहा’ पोहचवा आणि हा चहाचा कप ‘वर्ल्ड कप’ ठरावा हे आमचे उद्दिष्ट आहे. जगाच्या पाठीवर मराठी माणसाने जगभरातल्या चहाप्रेमींसाठी घेतलेली ही गरूडझेपच ठरावी असं हे व्हिजन असणार आहे.

‘येवले चहा’ हा एक नामांकित ब्रँड म्हणून जगभर ओळखला जावा यासाठी येवले परिवारातील नेक्स्ट जनरेशन एकजुटीनेे सतत कार्य करत आहेत. यामध्ये परफेक्ट प्लॅनिंग आहेत. हार्ड वर्क तर सुरू आहेच. बेस्ट क्वॉलिटीसोबत इंटरनॅशनल बेस्ट सर्व्हिस देण्यासाठी येवले आता रेडी होत आहेत.

येवले चहाचे खरे यश म्हणजे या चहाची चव. जिभेवर रेंगाळणारी आणि मनात घर करणारी ही चव निर्माण करणारे हातही तितकेच महत्वाचे आहेत. अमृतुल्य चहाच्या उद्योगात संपूर्ण कुटुंबानेच यावे अशी उदाहरणे क्वचितच आढळतील. परंतु येवल्यांकडे मात्र सगळेच भाऊ एकत्र आले ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच म्हणजेच स्वतःचा ‘ब्रँड’ बनविण्यासाठीच ! त्यासाठी या सर्व भावंडांनी पूर्वीही अतोनात कष्ट घेतले आणि आजही हे सगळे हात एकत्रितपणे परिश्रम करित आहेत. प्रामाणिकपणे केलेले परिश्रम, नियोजनबध्द आखणी, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सर्वोत्कृष्ट ग्राहकसेवा ही येवले चहाची वैशिष्ट्ये हेच या टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

येवले चहा आज व्यवसायात भरारी घेत आहे. परंतु ‘आपल्यासारखे करावे सकळजन’ या उक्तीप्रमाणे आपल्या मराठी तरूणांनाही येवले चहा आज संधी देत आहे. हुशार व मेहनती असणाऱ्या मराठी तरूणांनी नोकरीत रमण्यापेक्षा उद्योगात प्रवेश करून कर्तृत्व गाजवावे ही भावना येवल्यांच्याही मनात आहे. त्यामुळेच आज ‘येवले चहा’ या ब्रँडची फ्रॅन्चाईजी धनिक मंडळींना न देता, होतकरू मराठी नवउद्योजकांना देण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. या दृष्टीकोनामुळेच संपूर्ण महाराष्ट्रभर आपले मराठी तरूण या ब्रँडसोबत उद्योगविश्वात यशस्वी पदार्पण करत असताना दिसत आहेत.

about-image